बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे.
गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजासह अनेक गणपतींचं थोड्याच वेळात विसर्जन होणार आहे. गुलालाची उधळण करत, जयघोष करत लालबागच्या राजाची थोड्याच वेळात विसर्जन मिरवणूक निघणार आहे.
शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील चौपाट्यांवर पालिकेसह पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. लालबागचा राजाची थोड्याच वेळात विसर्जन मिरवणूक निघणार आहे.
लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत ठिकठिकाणी मोठमोठे हार घालण्यात येणार असून मिरवणूक मार्गावर मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. विसर्जन मिरवणूकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पारंपारिक पद्धतीत ही मिरवणूक निघणार असून मिरवणुकीची तयारी करण्यात येत आहे.